ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची 50 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्यांची 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ही घटना दहा जानेवारी 2023 ते आज पर्यंत सी/10, अक्षयनगर फेज वन, विशालनगर ,पिंपळे निलख येथे घडली.
याप्रकरणी एका 40 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबरीश जोशी (वय 43 आणि एक महिला, रा. ई, 14, अक्षयनगर फेज वन, विशाल नगर, पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी जादा परतावा देतो असे आमीष फिर्यादी यांना दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन फिर्यादी यांची 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हैसाळे हे तपास करत आहेत.

देशी दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!
पिंपरी : विनापरवाना अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार तीन जून रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलच्या मागे भिंतीलगत ,बिंदू सोसायटी समोर थरमॅक्स चौक, चिंचवड येथे करण्यात आली
याप्रकरणी उद्धव बद्रीनाथ खेडकर पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट एक यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मेघराज विठ्ठल पाटील (वय 40, रा. सर्वे नंबर 179, पांढरकर वस्ती गणपती मंदिराजवळ, आकुर्डी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने खाकी रंगाचे कागदी खोक्यात पॉवर लाईन पंच, देशी दारू नव्वद मिलिमीटरच्या एकूण 100 बाटल्या असा एकूण 81 हजार रुपये किंमतीचा प्रोव्हिचा देशी दारूचा माल विनापरवाना विक्रीसाठी जवळ बाळगला. निगडी पोलीस ठाण्याचे चौधरी हे तपास करत आहेत.

