डीसी (सिनिअर) संघ एक गडी राखून विजयी !

कार्तिक यादव सामनावीर
पिंपरी : एमआय (सीनियर) संघ विरुद्ध डीसी (सिनियर) संघ यात राजमाता जिजाऊ नगर रावेत येथील क्रीडांगणावर झालेल्या ५० षटकांच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीसी (सिनिअर) संघ एक गडी राखून विजयी झाला. या सामन्यात कार्तिक यादव सामनावीर ठरला.

एमआय(सीनियर)संघ ३७ षटके सर्वबाद २१२ धावा:- वेद पाटील १८, गौरांग झावरे ८१, अतिश कोळेकर १६, श्लोक सूर्यवंशी २९, विलोहित वाघ १७, शिवांश सुकाळे ३/३४, कार्तिक यादव ३/२०.
डीसी(सीनियर) संघ ३६ षटके ९ बाद २१४ धावा:- नागेश गड्डी ४६, शौर्य ३६, सोहम बेहेरे २६, कार्तिक यादव ३६ मीतांश सराफ १६, ऋग्वेद एरंडे २/२०, वेद पाटील २/३४, श्लोक सूर्यवंशी २/१९, गौरांग झावरे २/१४.
दिवेकर क्रिकेट अकॅडमीने आयोजित केलेल्या दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग सीनियर गट ५० षटकांच्या या स्पर्धेत अमेय देवस्थळे,वेद पाटील,प्रयोज गायकवाड,शिवेंद्र शिंदे, अथर्व जाधवर यांनी आपापल्या संघासाठी सुरेख शतके झळकावली तर मीतांश सराफ,असित देशपांडे,सर्वेश साळुंखे, सोहम शिंदे, श्रावण मुरूमकर यांनी एका डावामध्ये ४ पेक्षा जास्त बळी मिळवून गोलंदाजीत चमक दाखवली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, दिवेकर क्रिकेट अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक सुनील दिवेकर, प्रशिक्षक मुकेश गुजराथी यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना नरेंद्र कदम म्हणाले की सर्व खेळाडूंनी या स्पर्धांचा लाभ उठवावा कारण या स्पर्धा खेळाडूंना आत्मविश्वास देतात. याप्रसंगी सर्व स्पर्धेतील उत्तम खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली या समारंभास खेळाडू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या दोन्ही स्पर्धेतील खेळाडूंना (सिनियर स्पर्धा गट व ज्युनिअर स्पर्धा गट) पारितोषिके देण्यात आली यात (सिनियर स्पर्धा गट) उत्कृष्ट फलंदाज अमेय देवस्थळे, उत्कृष्ट गोलंदाज मीतांश सराफ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मितांश सराफ, स्पर्धेचा उत्तम खेळाडू वेद पाटील, (ज्युनिअर स्पर्धा गट) उत्कृष्ट फलंदाज अर्चित कुलकर्णी, उत्कृष्ट गोलंदाज आतिष कोळेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रिधान महाजन, उत्कृष्ट अष्टपैलू पार्थ तावरे, स्पर्धेचा उत्तम खेळाडू शिवांश सुकाळे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक देण्यात आली.

