आयशर टेम्पोला पाठीमागून दुचाकीस्वराची धडक ; दोघांचा मृत्यू

पिंपरी : आयशर टेम्पोला पाठीमागून दुचाकी जोरदारपणे धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 25 मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक -पुणे हायवे रोडवर चिंबळी फाटा, मोई, कुरुळी येथे घडली.

या प्रकरणी रितेश वैकुंठराव भगत (वय 21, साने चौक, चिखली, मुळगाव- बेलेरा खुर्द, ता. आष्टी, जि. वर्धा यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आयशर गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिलकेश प्रसाद काळपांडे व दुचाकी गाडीवर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र रुपेश दिगंबर भरकक्षे असे पुणे नाशिक रोड ने पल्सर गाडी क्रमांक (एम एच 32/ ए क्यू/ 89 43) वरून जात असताना चिंबळी फाटा येथे मोई गावाकडे जाणाऱ्या वळणाजवळ आयशर गाडी क्रमांक( एमएच 12/ एस एक्स/ 44 81) वरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणे हायगयीने रस्त्याच्या वाहतूकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवले. अचानक आयशर वाहनाचा वेग कमी केल्याने व टेम्पो डाव्या बाजूला घेतल्याने फिर्यादीचा मावस भाऊ चालवीत असलेली पल्सर गाडी आयशर टेम्पोला मागून धडकून त्यामध्ये त्यांचा मावस भाऊ शिलकेस काळपांडे व त्याचा मित्र रुपेश दिगंबर भरकक्षी या दोघांना डोक्याला, हाताला, पायाला, छातीला, गंभीर मार लागून जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पल्सर गाडीचे मोठे नुकसान झाले. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे घुले हे तपास करत आहेत.

