आदेशाचा भंग करून घातक शस्त्र जवळ बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी : घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचा भंग करून एका व्यक्तीने धारदार लोखंडी सत्तुर जवळ बाळगल्याने त्यास पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवार 21 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मोकळ्या मैदानावर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी अक्षय शिवाजी साळुंखे पोलीस शिपाई, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहसीन समीर सय्यद (वय 25, रा. रूम. नंबर 21, पपया चाळ, खराळवाडी पिंपरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपीने कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ धारदार लोखंडी सतुर हे हत्यार जवळ बाळगून थांबलेला असताना पोलिसांनी आरोपीस अटक केली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोकड हे तपास करीत आहेत.

अंमली पदार्थ गांजा विक्री ; महिलेला अटक!
पिंपरी : बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही घटना बुधवार 20 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सत्यम फॅब्रिकेशन शेजारील अंतर्गत गल्लीमध्ये मोकळ्या जागेत, खंडोबा माळ, आकुर्डी येथे घडली.
याप्रकरणी मितेश मोहन यादव पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड, यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेविरोधात (वय 58, राजमतानी खडीमशीन झोपडपट्टी, खंडोबामाळ, आकुर्डी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यम फॅब्रिकेशन शेजारील अंतर्गत गल्लीमध्ये मोकळ्या जागेत खंडोबामाळ ,आकुर्डी येथे महिला आरोपी हिने 17 हजार दोनशे रुपये किंमतीचा 344 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याने अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजगेकर हे तपास करीत आहेत.

