फक्त मुद्द्याचं!

15th May 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचा भंग;आरोपीला अटक!

तडीपार आदेशाचा भंग;आरोपीला अटक!

पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून घातक शस्त्र कोयता जवळ बाळगल्याने देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार 14 मे रोजी महात्मा गांधी विद्यालया मागे देहूरोड येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

प्रकरणी मोमीन सुलेमान शेख पोलीस शिपाई, देहूरोड पोलीस ठाणे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. समीर दीपक डिक्का (वय 23, रा. पारशी चाळ, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपरीच्या आदेशाचा भंग करताना त्याने कोणतीही परवानगी घेतली नाही. शिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना घातक शस्त्र कोयता दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला. देहूरोड पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड हद्दीत बेकायदेशीरित्या फिरताना तो मिळून आला. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विधाते हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"