फक्त मुद्द्याचं!

11th May 2026
पिंपरी-चिंचवड

कुदळवाडी, जाधववाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर पहाटे निष्कासन कारवाई!

कुदळवाडी, जाधववाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर पहाटे निष्कासन कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मौजे चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरआज भल्या पहाटे निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

viara vcc
viara vcc

या कारवाईमध्ये कुदळवाडी येथील विसावा चौक ते पोलीस चौकी रस्त्यावरील गट क्रमांक ७०० मधील अनधिकृत पत्राशेड, जाधववाडी रस्ता येथील गट येथील अनधिकृत वीट बांधकाम पत्राशेड, कुदळवाडी पोलीस चौकीजवळील गट क्रमांक ६७८ मधील अनधिकृत आरसीसी बांधकाम तसेच सावता माळी मंदिर रस्ता, जाधववाडी येथील अनधिकृत पत्राशेड अशा विविध बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बांधकाम परवानगी विभागाचे १२ उपअभियंते, ४ कनिष्ठ अभियंते, २४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), धडक कारवाई पथकातील ८ क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सुमारे १२०० अधिकारी व कर्मचारी आणि २१८ एमएसएफ जवान सहभागी झाले होते.

सदर कारवाईसाठी १० पोकलेन, १० जेसीबी, ५० मजूर, ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच महापालिका प्रशासनासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनीही कारवाईत सहभाग घेतला.

“पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे उभारू नयेत. नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला सहकार्य करावे. – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"