फक्त मुद्द्याचं!

10th May 2026
गुन्हेगारी

गॅंगरेप ; चार आरोपींना न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा!

गॅंगरेप ; चार आरोपींना न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा!

पिंपरी : सन 2021 मध्ये संगनमताने निर्भयावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार जबरदस्ती सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी नुमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुस्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्ना जोवद खान, सोहेल शेर अली पिरजादे आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

viara vcc
viara vcc

देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली असून ही घटना 2021 मध्ये घडली आहे. आरोपींनी संगणमताने जबरदस्तीने अत्याचार केले होते. निर्भयावर जबरदस्तीने अत्याचार करून अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपींनी निर्भयाला मारहाण करून तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी व मानसिक शारीरिक छळ केला. या आरोपी विरोधात देहूरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नुमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुस्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्ना जोवद खान, सोहेल शेर अली पिरजादे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासांती तात्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. गुन्ह्याचा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांच्या कोर्टामध्ये चालू होता. या खटल्यामध्ये वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे यांच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन भक्कम पुरावे सादर केले होते. न्यायालयाने साक्षी पुरावे व युक्तिवादाच्या आधारे चारही आरोपींना दुहेरी जन्मठेप करावासाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यातील साक्षीदार पंच व फिर्यादी यांना वेळोवेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मार्गदर्शन करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"