फक्त मुद्द्याचं!

7th May 2026
पिंपरी-चिंचवड

नगरसेवकाच्या आरोपाला पोलीसांकडून स्पष्टीकरण!

नगरसेवकाच्या आरोपाला पोलीसांकडून स्पष्टीकरण!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून पोलिसावर करण्यात आलेल्या आरोपाचे पोलिसांनी खंडन केले आहे. काळेवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक विनोद नढे यांनी पोलिसांनी साक्षीदार आणण्याची मागणी केली व लोकप्रतिनिधीशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप केला. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण देत गुन्हा तात्काळ नोंदवून आरोपीला त्याच दिवशी अटक केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी येथे 14 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक पथक पिडीतेच्या घरी तर दुसरे पथक रुग्णालयात पाठवले होते. त्याच दिवशी गुन्हा दाखल करून आरोपीला भोसरी येथून अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंगळवार 5 मे रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक विनोद नढे यांनी या प्रकरणावरून पोलिसांवर टीका केली. पीडित मुलगी उपचार घेत असताना आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी साक्षीदार आणण्यास सांगितले असा आरोप नढे यांनी केला. पोलीस अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला.

या आरोपावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले असल्याचे नमूद करत काही व्हिडिओ क्लिप्स द्वारे दिशाभूल होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी तक्रार अर्ज देण्याच्या अगोदरच आरोपीवर गुन्हा दाखल करून जास्तीत जास्त कडक कलमे लावली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"