बँकेतून बोलत असल्याचे सांगून एक लाख 90 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक!

पिंपरी : अनोळखी महिलेने मोबाईल वर फोन करून आयसीआयसीआय बँकेमधून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन संपत असल्याचे फिर्यादीला सांगून आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख 90 हजार 466 डेबिट करून ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना 20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन घडली .
या प्रकरणी एका व्यक्तीने एका महिला आरोपी मोबाईल धारक विरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनोळखी महिलेने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन करून आयसी आयसीआय बँकेमधून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन संपत असल्याचे सांगितले. आरोपीने व्हाट्सअप द्वारे थर्ड पार्टी लिंक पाठवून आय मोबाईल ॲप्लिकेशन अपडेट करण्यासाठी सदरची लिंक ओपन करण्यास सांगितले. सदरची लिंक ओपन केली असता फिर्यादीचे आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वरून 1 लाख 90 हजार 466 डेबिट होऊन ऑनलाईन फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिसाळ हे तपास करत आहेत.

मोबाईल धारकाने केली 1लाख 31 हजाराची ऑनलाइन फसवणूक!
पिंपरी : पतीच्या वाढदिवसासाठी झोमॅटो वरून केक मागविला. केक वेळेत न आल्याने तुमचे पैसे परत करतो असे सांगून फिर्यादीचा फोन चालू ठेवण्यास सांगून फिर्यादीच्या ॲक्सिस बँक व आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक वरून एक लाख 31 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना 31 जानेवारी साडेचार ते येथे घडली साडे सहा दरम्यान फ्लॅट नंबर बाराशे दोन, सांग्रिया मेगा पॉलीस सोसायटी, माण, हिंजवडी फेज तीन येथे घडली.
याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी मोबाईल धारक (अनोळखी व्यक्ती नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या पतीचा वाढदिवस असल्याने त्यासाठी झोमॅटो वरून केक मागविला. तो केक वेळेत न आल्यामुळे झोमटोच्या कस्टमर केअरचा मोबाईल नंबर वरील अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला तुमचे पैसे परत करतो असे सांगून फिर्यादीचा फोन तसा चालू ठेवण्यास सांगितला. फिर्यादीच्या मोबाईलवर इंग्रजीमध्ये प्लीज वेट रिफंड मनी प्रोसेस असा मेसेज पाठवला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या ॲक्सिस बँक व आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक वरून 1 लाख 31 हजार रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत. झोमॅटो कस्टमर केअरच्या मोबाईल धारकाने केली 1लाख 31 हजाराची ऑनलाइन फसवणूक

