फक्त मुद्द्याचं!

7th May 2026
गुन्हेगारी

विक्री कराचे 52 कोटी 65 लाख 88 हजार रुपये थकविले!

विक्री कराचे 52 कोटी 65 लाख 88 हजार रुपये थकविले!

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : व्यापाऱ्याने धंदा केला मात्र 2014 ते 2017 या कालावधी मधील विक्री कराची 52 कोटी 65 लाख 88 हजार 899 रुपयाची थकबाकी न भरल्याने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना एक जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर २०१८ दरम्यान मे बिग व्हिजन वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड, पाटील नगर, चिखली येथे घडली.

याबाबत सोमनाथ पोपट रणदिवे वय 37 राज्यकर निरीक्षक (सी 602) पुणे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चंद्रकांत महादेव मोरे व महिला (रा. दोघेही पाटील नगर चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी धंदा केला आहे. मात्र विक्री कराची थकीत 52 कोटी 65 लाख 88 हजार 899 रुपये भरले नाहीत. 2014 ते 2017 या कालावधीच्या निर्धारणेकरीता हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली. परंतु ते हजर राहिले नाहीत. तसेच विक्री कराची थकबाकी देखील भरली नाही .याबाबत व्यापाऱ्याला वारंवार कार्यालयाकडून नोटीस बजावली आहे. परंतु त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेळीमकर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त ;एकास आटक
पिंपरी : कोणत्याही प्रकारचा पिस्टल वापरण्याचा परवाना नसताना 50 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याने शस्त्रसंधी आदेशाचे उल्लंघन केले आहे.आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार चार मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मेदनकरवाडी, तालुका खेड गावचे हद्दीत करण्यात आली.

अमोल पोपट माटे पोलीस शिपाई, चाकण दक्षिण पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नकुल शंकर लोखंडे (वय 19, वैदुवाडी, वीट भट्टी जवळ ,मेदनकरवाडी, ता. खेड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडे पिस्टल बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याने आपल्याजवळ बेकायदेशीररित्या 50 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुस बाळगली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीमध्ये घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"