फक्त मुद्द्याचं!

2nd May 2026
गुन्हेगारी

ऑनलाइन खरेदी; 95 हजार रुपयांचा घातला गंडा!

ऑनलाइन खरेदी; 95 हजार रुपयांचा घातला गंडा!

पिंपरी : मीशो अँप वरून खरेदी करत असताना ऑर्डर प्लेस न होता पैसे कट झाले. गुगल वरून मिस यु ॲपचा नंबर सर्च करून त्यावर संपर्क साधला असता त्यावरील व्यक्तीने फिर्यादी यांना अज्ञात व्हाट्स ॲप नंबर देऊन मोबाईल व व्हाट्सॲप सेटिंग मध्ये काही बदल करण्यास सांगून त्याद्वारे 95 हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. ही घटना 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहते घरी, 51/1, फोर्स मोटर्स कॉलनी, मुंबई- पुणे रोड ,आकुर्डी येथे करण्यात आली.

vcc maharastra din
vcc maharastra din

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात व्हाट्सॲप नंबर वरील अज्ञात इसम ,तसेच फिर्यादी यांची रक्कम ज्या बँक खात्यात गेली ते सर्व बँक खातेदार धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या मिशो अँप वरून ऑनलाईन खरेदी करीत असताना ऑर्डर प्लेस न होता पैसे कट झाल्याने त्यांनी गुगल वरून मिशोचा नंबर सर्च करत त्यावर संपर्क साधला असता, त्यावरील व्यक्तीने फिर्यादी यांना अज्ञात व्हाट्सॲप नंबर देऊन त्यावर संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी कॉल केला असता फिर्यादी यांच्या मोबाईल व व्हाट्सॲप सेटिंग मध्ये काही बदल करण्यास सांगून त्याद्वारे एकूण 95 हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे हे तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"