फक्त मुद्द्याचं!

2nd May 2026
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल अखेर ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल अखेर ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यरत असताना प्रामाणिकपणा व निष्ठेने दिलेल्या सेवा व योगदानामळे संस्थेची भक्कम पायाभरणी झाली असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले व त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

vcc maharastra din
vcc maharastra din

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सन्मान समारंभात माहे एप्रिल २०२६ अखेर नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक कुशाग्र कदम, उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, ‘आज सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिकेत उत्कृष्ट सेवा बजावत आपली जबाबदारी पार पाडली आहे. सेवानिवृत्तीनंतर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांनी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. तसेच सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा नव्या संधींचा असल्याने समाजकार्यात सक्रिय सहभाग घेऊन आनंदी व समाधानकारक आयुष्य जगावे, असे देखील त्या म्हणाल्या.

“सेवानिवृत्ती ही केवळ कागदावर असते, मनाची नसते” या भावनेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर जपलेली लोकसेवा आणि कर्तव्यनिष्ठा यापुढेही सुरू ठेवावी,शहराच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदवावा आणि आपल्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीला करून द्यावा असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितो॓ळे म्हणाले.

एप्रिल २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता सुनील वाघमारे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र फिरके, मुख्याध्यापक (प्राथमिक शिक्षण) जयमाला गावडे, चंदा काकडे, सिस्टर इन्चार्ज रोहिणी काकडे, मुख्य लिपिक प्रकाश बाणेकर, राजकुमार यादव, मुरगू बोटे, माया गिते, उपशिक्षक सुनिता इंगळे, फार्मासिस्ट मिलिंद पंडित, सांख्यिकी सहाय्यक प्रशांत उमराणी, वाहन चालक विलास ढोरे, रखवालदार गुलाब हिले, शिपाई विजय कदम, मजूर राजू कुटे, सुरेश देवकर, भिमाजी देवकर, सफाई कामगार पुष्पा ओव्हाळ, रामलिंग गायकवाड यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांत कार्यकारी अभियंता राजेंद्र मोराणकर, स्टाफनर्स मंगल डफळ, मुकादम सुनील माने, प्रविण डोळस, सफाई कामगार शाम मासरे, कांता शितोळे, मच्छिंद्र सोनवणे, सफाई सेवक महंमद कादर, तुकाराम गोफणे, दीपक उबाळे यांचा समावेश आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"