नोकराने एचपी कंपनीचे 8 लाख पाच हजार रुपये किंमतीचे 23 लॅपटॉप चोरले!

पिंपरी : कंपनीमध्ये नोकरीस असताना वेळोवेळी एचपी कंपनीचे आठ लाख पाच हजार रुपये किंमतीचे 23 लॅपटॉप कंपनीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले. ही घटना सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत टेट्रा पॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चाकण एमआयडीसी, ता. खेड येथे कंपनीच्या स्टोररूम मध्ये घडली.
याप्रकरणी संजय सुदाम गाडे (वय 54, रा. बालाजी अक्रेड, फ्लॅट नंबर 12 ,कोर्टाच्या मागे ,ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वप्नील सुनील पाटील (वय 33, बिल्डिंग 1102, ॲन्जोर सोसायटी, वीरभद्र नगर, बाणेर, मुळगाव- नेरले, ता. वाळवा, जि. सांगली, कंपनीचा स्टाफ आयटी ऍनालिस्ट )असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी टेट्रा पॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरीस असताना वेळोवेळी एचपी कंपनीचे आठ लाख पाच हजार रुपये किंमतीचे एकूण 23 लॅपटॉप संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी हे तपास करत आहेत.

नोकराने संमतीशिवाय मालाचे 1 लाख पंधरा हजार लांबविले!
पिंपरी : नोकराने मालाचे पैसे परस्पर घेऊन 1 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शनिवार 25 एप्रिल रोजी विकी फुटवेअर्स ,लकी बेकरी काळेवाडी ते ताथवडे धायरी या ठिकाणी घडली.
याबाबत विकास विनोद रमनानी (वय 30, नंबर 1001, अक्रोपॉलिश, निरंकारी भवन जवळ, विजय नगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. युनूस खान (वय 30, सध्या- रा. नढे नगर ,काळेवाडी, पिंपरी )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने आरोपीकडे विश्वासाने दिलेला माल व मालाचे पैसे फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने ताथवडे येथील ए टू झेड फुटवेअर येथून 45000, ए टू झेड फुटवेअर धायरी येथून 70 हजार रुपये रोख अशी एकूण एक लाख पंधरा हजार रुपये रक्कम फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीने आरोपी घेऊन आला. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे तपास करत आहेत.

