शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी; सुनेत्रा पवारांना साकडे!

पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांची मुंबईत देवगिरी या निवासस्थानी भेट घेऊन विधान परिषदेसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत योगेश बहल यांना संधी देण्याबाबत एकमताने नाव सुचवण्यात आले आहे. बहल हे 1992 पासून आज पर्यंत सात वेळा पिंपरी चिंचवड महापालिकेत सदस्य राहिले आहेत .त्यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारुढ पक्षनेतापद अशी विविध पदे भूषवली आहेत. शिवाय दिवंगत अजितदादा पवार यांचे निष्ठावंत आहेत. त्यांनी पक्षाची गेली अनेक वर्ष सेवा केली असल्याने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी असे निवेदन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक डब्बू आसवानी, जितेंद्र ननावरे, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, नगरसेविका डॉक्टर वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, निकिता कदम, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतीक्षा जवळकर, दीप्ती कांबळे तसेच माजी नगरसेवक शामराव लांडे, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, अंबरनाथ कांबळे, तानाजी खाडे, माजी नगरसेविका सीमा सावळे, फजल शेख, प्रकाश सोमवंशी, ज्ञानेश्वर कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

