फक्त मुद्द्याचं!

25th April 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारांची भरती!

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारांची भरती!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवर सन २०२६-२७ या एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करणेकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मुख्य पृष्ठ — भरती — शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२६ – २७ किंवा मुख्य पृष्ठ — आमच्याबद्दल — नोकरी विषयी — शिकाऊ उमेदवारनेमणूक सन २०२६ – २७ या मेनूमध्ये औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत गुरुवार २३ एप्रिल २०२६ रोजी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice) नेमणूकीकरीता मनपाच्या विविध विभागात कोपा (COPA), वीजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (RACT), नळ कारागीर (Plumber), डेस्कटॉप ऑपरेटींग (DTPO), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (POCM), भूमापक (Surveyor), आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil), मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV), इंस्ट्रुमेंट मेकॅनिक (IM), माळी (Gardner) या १२ व्यवसायाच्या एकूण ४०७ जागा आरक्षणनिहाय भरणेकरीता उपलब्ध आहे. यासाठी सन २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित व्यवसायामध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

तरी इच्छुक उमेदवारांनी मनपा पोर्टलवरील जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने दि. २७/०४/२०२६ ते दि. ०६/०५/२०२६ पर्यंत www.apprenticeshipindia.gov.in (NAPS Portal) या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे व दि. २७/०४/२०२६ ते दि. ०८/०५/२०२६ पर्यंत Document Verification करीता आय. टी. आय., मोरवाडी संस्थेत समक्ष हजर राहणे आवश्यक राहील. असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"