फक्त मुद्द्याचं!

23rd April 2026
पिंपरी-चिंचवड

मैलापाणी प्रक्रिया न करता सोडणाऱ्या खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रावर कारवाई!

मैलापाणी प्रक्रिया न करता सोडणाऱ्या खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रावर कारवाई!

फक्त ७० हजार रुपयांचा दंड वसूल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रांची (STP) तपासणी मोहीम १७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. यावेळी उपद्रव शोध पथकाकडून अनधिकृत पद्धतीने मैलापाणी प्रक्रिया न करता सोडणाऱ्या मैलाशुद्धीकरण केंद्रांवर कडक कारवाई करत ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

viara vcc
viara vcc

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील एकूण २१ मैलाशुद्धीकरण केंद्रांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत ९ मैलाशुद्धीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याचे आढळून आले, तर १२ केंद्रांमधून पूर्णतः अथवा अंशतः प्रक्रिया न केलेले मैलापाणी अनधिकृतपणे प्रक्रिया न करता बाहेर सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येऊन एकूण ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ज्या सोसायट्यांनी अद्याप मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केलेले नाही किंवा निर्माण होणारे मैलापाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडत आहेत, त्यांनी तात्काळ मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करून पाण्याचा पुनर्वापर करावा, अन्यथा नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मैलाशुद्धीकरण केंद्र असूनही प्रक्रिया न केलेले मैलापाणी बाहेर सोडणे ही गंभीर बाब असून याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित सोसायट्यांनी नियमांचे पालन करून पाण्याचा पुनर्वापर करावा, अन्यथा कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.” – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"