फक्त मुद्द्याचं!

23rd April 2026
गुन्हेगारी

सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल जप्त; दोघांना अटक!

सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल जप्त; दोघांना अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आदेशाचा भंग करून एक लाख 31 हजार रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल, सहा जिवंत काडतुस (राऊंड) बाळगल्याने दोन सराईतांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडीकडे जाणाऱ्या रोडवरील पादचारी मार्गावर भोसरी सांगवी ब्रिजचे खाली कासारवाडी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी प्रवीण दौलत पाटील पोलीस हवालदार, दापोडी पोलीस स्टेशन यांनी दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यश नंदकिशोर कांबळे (वय 19, महालक्ष्मीनगर, गल्ली नंबर चार, पिंपळे गुरव), अथर्व सुनील भोकरे (वय 21, रा. संत तुकारामनगर, गल्ली नंबर दोन, नवी सांगवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई असताना आदेशाचा भंग करून एक लाख 31 हजार रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझींनसह, सहा जिवंत काडतुस (राऊंड) दोन मोकळी मॅक्झिन कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या जवळ बाळगले. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"