केमिकल शॉप मधील माल विकून नोकराने 41 लाख 82 हजारांची केली फसवणूक!

पिंपरी : केमिकल शॉप मधील (लिक्विड तसेच पावडर केमिकल) हा माल परस्पर नोकराने वेळोवेळी विकून सुमारे 41 लाख 82 हजार 614 रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केला. ही घटना एक ऑगस्ट 2023 ते 24 मार्च 2025 या कालावधीत सर्वे नंबर 15/2/3 , एस ब्लॉक जवळ, गुळवे वस्ती, भोसरी येथे गुडविल केमिकल शॉप मध्ये घडली.

याबाबत गुडविल केमिकल शॉप चे अमित श्रीरामजी दरक (वय 41, रा. फ्लॅट नंबर चार, कनकधारा अपारमेंट, प्लॉट नंबर 432, समर्थ कॉलनी, इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .राजेंद्र हनुमान कासटरा (रा.कमलराज परिजात सोसायटी, आळंदी रोड, दिघी), संदीप ज्ञानदेव सदांशिव (रा. कौशल्या निवास, आळंदी रोड, भोसरी), बाबुराव बोराडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुडविल केमिकल्स शॉप मध्ये राजेंद्र हनुमान कासटरा हे नोकर म्हणून काम करत आहेत त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने रिक्षाचालक बोराडे यांच्याशी संगणमत करून शॉप मधील (केमिकल लिक्विड तसेच पावडर केमिकल) आदि माल वेळोवेळी शॉप मालकाला न सांगता परस्पर विक्री केला. यातून त्यांनी 41 लाख 82 हजार 614 रुपयांचा अपहार करून विश्वासघात केला. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे हे तपास करत आहेत.

