फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
गुन्हेगारी

पोलीस कॉन्स्टेबलला ब्लॅकमेल करून मागितली खंडणी;एकास अटक!

पोलीस कॉन्स्टेबलला ब्लॅकमेल करून मागितली खंडणी;एकास अटक!

पिंपरी : वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलला ब्लॅकमेल करून खंडणी स्वरूपात 50 हजार रुपये तसेच गाडीवरील 13000 रुपये दंड भरण्याची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील वाकड वाहतूक शाखेमध्ये घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत मच्छिंद्र निवृत्ती बारामते (वय 31, पोलीस कॉन्स्टेबल, वाहतूक नियंत्रण शाखा वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरद मनोज चव्हाण (रा. विद्युत कॉलनी कन्नड जवळ, शुगर फॅक्टरी, संभाजीनगर), विश्वजीत (वय अंदाजे 19) अथर्व क्षीरसागर (वय अंदाजे 19 ,दोघांचा पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वरद मनोज चव्हाण या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनी संगणमत करून येऊन मंगळवार 14 एप्रिल रोजी वाकड येथे तपासणी दरम्यान आरोपी वरद चव्हाण याचे सीबीझेड एक्स्ट्रीम मोटरसायकल क्रमांक (एम एच, 20, सीएफ /38 60) गाडीवरील दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये घेताना त्यांनी केलला व्हिडिओ शूटिंग दाखवून हा व्हायरल करतो अशी दमदाटी पोलिसांना केली. हा व्हिडिओ शूटिंग व्हायरल करायचे नसेल तर मला 50 हजार रुपये तसेच माझ्या गाडीवरील 13000 रुपये दंड भरावा अशी खंडणी स्वरूपामध्ये आरोपीने फिर्यादी यांच्याकडे मागणी केली. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"