फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
गुन्हेगारी

चिखली येथील “आदित्य लॉज”वर पोलिसांचा छापा; नऊ पीडित महिलांची सुटका; दोघांना अटक!

चिखली येथील “आदित्य लॉज”वर पोलिसांचा छापा; नऊ पीडित महिलांची सुटका; दोघांना अटक!

पिंपरी : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार चिखली, देहू -आळंदी रोड येथील आदित्य लॉजवर पोलिसांनी छापा टाकून नऊ पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये एका बांगलादेशी महिलेचा समावेश आहे. ही कारवाई सोमवार 13 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी लॉज मॅनेजर व कामगाराला अटक केली आहे. अन्य पाच जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजच्या नावाखाली आदित्य लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली शेंडगे यांनी धडक कारवाई केली. वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या नऊ पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यातील एक पीडित महिलेस आरोपी यांनी तस्करी करून बांगलादेशातून आणले होते. पोलिसांनी तिची सुटका केली असून तिला मायदेशी परत पाठवण्याकरता प्रक्रिया सुरू केली आहे.

लॉजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणी लॉजचे चालक सुदर्शन पवार (रा. मुंबई ),जागा मालक नाना बोराटे (रा. पुणे ),लॉज मॅनेजर अशोक बाबर (रा. चिखली, पुणे), लॉज मॅनेजर साहिल उर्फ शाहीन शिराजुल मंडल (रा. पश्चिम बंगाल), लॉज कामगार अकीबुल मुल्ला (वय 22, रा. आदित्य लॉज, लक्ष्मी चौक, चिखली) यांच्या विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून मॅनेजर अशोक बाबुराव बाबर व लॉज कामगार अकीबुल खालेक मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे) एक यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राऊत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिकक्षाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली शेंडगे, अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सुनील शिरसाट, पोलीस हवालदार भगवंता मुठे ,संगीता जाधव, दहशतवाद विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार निकम, कुटे, पाटील, भोगल यांच्या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"