फक्त मुद्द्याचं!

16th April 2026
पिंपरी-चिंचवड

प्रतिक रॉयल्स्‌‍, सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍, शेट्टी बन्ट् वॉरीयर संघ उपांत्य फेरीत !

प्रतिक रॉयल्स्‌‍, सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍, शेट्टी बन्ट् वॉरीयर संघ उपांत्य फेरीत !

दुसरी ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धा;प्रतिक रॉयल्स्‌चा सईश शिंदे सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रतिक रॉयल्स्‌‍, सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ आणि शेट्टी बन्ट् वॉरीयर या संघांनी आपापल्या गटातून अव्वल गुण मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वीच सह्याद्री किंग्ज संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

viara vcc
viara vcc

प्रतिक रॉयल्स्‌‍ संघाने मोरे पाटील पॅकर्सचा केला तीन गडी राखून पराभव
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सईश शिंदे याने केलेल्या ६५ धावांच्या जोरावर प्रतिक रॉयल्स्‌‍ संघाने मोरे पाटील पॅकर्सचा तीन गडी राखून पराभव केला. जयेश राठोड याने केलेल्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर पहिल्यांदा खेळणाऱ्या मोरे पाटील पॅकर्स संघाने २० षटकात १६५ धावांचे लक्ष्य उभे केले. तिलक जाधव याने ४२ धावांची खेळी केली. हे लक्ष्य प्रतिक रॉयल्स्‌‍ संघाने २० षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. सईश शिंदे याने ४६ चेंडूत ११ चौकारांसह ६५ धावांची आणि रोमित जोशी यानेसुद्धा ६५ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५५ चेंडूत ६९ धावांची भागिदारी करून संघाचा विजय निश्चित केला.

विश्वा टायगर्स संघाने सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाचा केला ६ गडी राखून पराभव
विशाल गव्हाणे याने केलेल्या नाबाद ६२ धावांच्या जोरावर विश्वा टायगर्स संघाने सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. यैशेल कुच्चल याच्या कामगिरीच्या जोरावर प्रतिक रॉजल्स्‌‍ने स्पोर्ट्‌‍स स्टोरीज्‌‍ ॲव्हेंजर्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
मोरे पाटील पॅकर्सः २० षटकात ४ गडी बाद १६५ धावा (जयेश राठोड नाबाद ९२ (६१, १४ चौकार), तिलक जाधव ४२, शशांक साबळे २-२९, सचिन सावंत २-३१); (भागिदारीः तिसऱ्या गड्यासाठी तिलक आणि जयेश १०० (७२) पराभूत वि.
प्रतिक रॉयल्स्‌ः २० षटकात ७ गडी बाद १६६ धावा (सईश शिंदे ६५ (४६, ११ चौकार), रोमित जोशी ६५ (४५, ४ चौकार, ४ षटकार), कार्तिक शेवाळे २-३०); (भागिदारीः सईश आणि रोमित यांच्यात ६९ (५५); सामनावीरः सईश शिंदे;

स्पोर्ट्‌‍स स्टोरीज्‌‍ ॲव्हेंजर्सः २० षटकात ९ गडी बाद १३१ धावा (वेरूण चौदरी २६, चैतन्य कोंदभर २३, प्रशांत तेलंगे २१, सचिन सावंत २-१८) पराभूत वि
प्रतिक रॉयल्स्‌: १८.५ षटकात ५ गडी बाद १३३ धावा (यैशेल कुच्चल नाबाद ३७ (२३, ४ चौकार, २ षटकार), रोमित जोशी २३, प्रदीप दसगुडे २०, वेरूण चौदरी ३-२७); सामनावीरः यैशेल कुच्चल;
सोनीगरा सुपरकिंग्ज्‌: १९.४ षटकात १२१ धावा (इर्शाद शेख ४३, नदाफ रौहूल्ला १६, ओमकार यादव २-१५) पराभूत वि.
विश्वा टायगर्सः १४.१ षटकात ४ गडी बाद १२७ धावा (विशाल गव्हाणे नाबाद ६२ (४४, ४ चौकार, ३ षटकार), आदी कुमार ३०, मेधांश शिंगोटे २-२५); सामनावीरः विशाल गव्हाणे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"