फक्त मुद्द्याचं!

14th April 2026
गुन्हेगारी

खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक!

खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक!

उत्तर महाळुंगे पोलीसांची कारवाई
चाकण : एका व्यक्तीचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला परिमंडळ 4 च्या उत्तर महाळुंगे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई रविवार 12 एप्रिल रोजी करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सागर बाळू जावळे (वय 34 रा कुरकुंडी) , नितीन संजय थिटे (वय 27 ,रा रेटवडी), सौरव उर्फ सोन्या अनिल ढोरे (वय 28, वरची भांबरवाडी), अजय भरत गोपाळे (वय 23 रा. अहिल्यादेवी चौक, खंडोबा माळ, राजगुरुनगर), कुणाल प्रशांत चव्हाण (वय 23, अहिल्यादेवी चौक, खंडोबा माळ, राजगुरुनगर) ओमकार दशरथ कोरडे (वय 24, रा, सांडभोरवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, प्रत्येकी पाच राऊंड गोळ्यांसह, एक लोखंडी कोयता, एक चाकू ,महिंद्रा कंपनीची थार चार चाकी क्रमांक (एम एच 14 जेवाय 00 90), हुंडाई कंपनीची आय टेन कार क्रमांक (एम एच 14 जे ए ० 732) हा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला आहे.

परिमंडळ 4 पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अमेझॉन कंपनीच्या गेट समोरून ऋषिकेश उर्फ दाद्या दिलीप कल्हाटकर (रा. कोरेगाव बुद्रुक) यास सागर जावळे व ओमकार चव्हाण यांनी साथीदारांसह येऊन महिंद्रा थार व आयटेन अशा दोन चार चाकी गाड्यां मध्ये बसून कल्हाटकर यांचे अपहरण केल्याची माहिती पोलीस यंत्रणेस डायल 112 कार्यप्रणालीवरून प्राप्त झाली. त्यानुसार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी तीन तपास पथके नेमून तपास सुरू केला. तांत्रिक पद्धतीने आरोपी सागर जावळे व ओमकार चव्हाण यांचा शोध घेतला असता ते खेड येथील क्रीडा संकुल परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. तेथे सापळा रचून महिंद्रा थार व आय टेन गाडी ची झडती पोलिसांनी घेतली. या झडतीमध्ये अपहरण करण्यात आलेला ऋषिकेश उर्फ दाद्या दिलीप कल्हाटकर यांच्यासह आरोपी सागर जावळे, नितीन थिटे, ओमकार चव्हाण असे मिळून आले. तसेच सोबतच्या आयटेन गाडीमध्ये त्यांचे इतर साथीदार मिळून आले.

उपायुक्त खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा मित्र शुभम काळे याच्या खुन अपहरण झालेल्या ऋषिकेश कल्हाटकर यांचा चुलत भाऊ संदीप कल्हाटकर व त्यांचे साथीदारांनी मिळून केला होता. संदीप यांच्या जामीनासाठी ऋषिकेश हा प्रयत्न करत असल्याने आरोपी त्याच्यावर चिडून होते. त्यातच 2024 मध्ये आरोपींनी ऋषिकेश कल्हाटकर यांच्यावर पिस्तूला मधून पाच राऊंड फायर केले असता त्यातील तीन राउंड त्याच्या छाती व कमरेत लागून गंभीर जखमी केले होते. त्या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .या गुन्ह्यातून आपले नाव वगळावे व गुन्हा मागे घ्यावा म्हणून आरोपी ऋषिकेश कल्हाटकर यांच्यावर दबाव टाकत होते. याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश कलाटकर यांचे अपहरण करून त्याच्या खुनाचा बेत उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे व युनिट चार यांचे अधिकारी व अंमलदार यांच्या सतर्क सतर्क व दक्ष तपासामुळे फसला आहे.

तपासात महाळुंगे एमआयडीसी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उत्तर महाळुंगे पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक, अनिस मुल्ला, जितेंद्र सिंग परदेशी व पोलीस अमलदार यांनी सहकार्य केले

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"