फक्त मुद्द्याचं!

14th April 2026
पिंपरी-चिंचवड

विश्व टायगर्स, असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघांची विजयी आगेकूच !

विश्व टायगर्स, असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघांची विजयी आगेकूच !

अथर्व भोसले याची नाबाद शतकी खेळी ; ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत विश्व टायगर्स आणि असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.

viara vcc
viara vcc

विश्व टायगर्स संघाकडून असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघाचा ७ गडी राखून पराभव
हिंजवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अथर्व भोसले याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विश्व टायगर्स संघाने असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ने १५० धावांचे लक्ष्य उभे केले. ध्रुवील रायताथा (नाबाद ३६ धावा), पृथ्वी सिंग (३२ धावा) आणि हिरा चौधरी (२३ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. हे लक्ष्य विश्व टायगर्स संघाने १९.२ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. अथर्व भोसले याने ७० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघाकडून शेट्टी बन्ट्स वॉरीयर्सचा १३ धावांनी पराभव
दुसऱ्या सामन्यात कुलदीप नायडू याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर शेट्टी बन्ट्स वॉरीयर्सचा असवानी डेअरडेव्हिल्स्‌‍ संघाने शे१३ धावांनी पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. कुलदीप याने १४ धावांत तीन गडी टिपले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
असवानी डेअरडेव्हिल्स्‌ : २० षटकात ७ गडी बाद १५० धावा (ध्रुवील रायताथा नाबाद ३६, पृथ्वी सिंग ३२, हिरा चौधरी २३, संभाजी शिंदे २-२५) पराभूत वि.
विश्व टायगर्सः १९.२ षटकात ३ गडी बाद १५४ धावा (अथर्व भोसले नाबाद १०२ (७०, १२ चौकार, ४ षटकार), ओम वदराईकर २२, कुलदीप नायडू २-१४); सामनावीरः अथर्व भोसले; फायटर ऑफ द मॅचः कुलदीप नायडू;

असवानी डेअरडेव्हिल्स्‌: २० षटकात ८ गडी बाद १४५ धावा (ऋषी नाले ४२, इंद्रजीत शिंदे २७, ध्रुव मलिक २०, गगनदीप सिंग २-२०, गणेश कालेल २-२४) वि.वि.
शेट्टी बन्ट्स वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १३२ धावा (श्रेयस जाधव १९, गणेश कालेल १८, हरीश बाकळे १७, कुलदीप नायडू ३-१४, ध्रुव मलिक २-२५, पृथ्वी सिंग २-२८); सामनावीरः कुलदीप नायडू; फायटर ऑफ द मॅचः गणेश कलाल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"