फक्त मुद्द्याचं!

6th April 2026
गुन्हेगारी

चारचाकी गाडी खरेदीपोटी दिल्या बनावट 3 लाखांच्या खेळण्यातील नोटा; दोघे जेरबंद

चारचाकी गाडी खरेदीपोटी दिल्या बनावट 3 लाखांच्या खेळण्यातील नोटा; दोघे जेरबंद

पिंपरी :अल्टो चार चाकी गाडी खरेदीचा सौदा झाल्यानंतर दोन व्यक्तींनी तीन लाख रुपयांच्या खेळण्यातील बनावट नोटा देऊन फसवणूक केली आहे. ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाच च्या सुमारास माणिक चौक, चाकण ते शिक्रापूर रोडच्या कडेला, चाकण, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत हुजेब फिरोज बागवान (वय 26, रा. फ्लॅट नंबर 24, बिल्डिंग ए यादगार सिटी, हरिकृपा नगर मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेश ज्ञानदेव ढाकरे (अंदाजे वय 21), समीर दिनकर म्हल्ले (वय 26, रा. रूम नंबर सहा, गणेश काकडे यांचे रूममध्ये भाड्याने शेलगाव, ता. खेड, मुळगाव- शिवसेना वसाहत, जुने शहर अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची अल्टो गाडी नंबर (एम एच बेचाळीस एक्स 5880) ही गाडी खरेदी करण्याची तयारी आरोपींनी दर्शवली. सदरची गाडी 3 लाख 50 हजार रुपयात खरेदी करणे बाबत व्यवहार ठरला. आरोपी यांनी फिर्यादीस विश्वास संपादन करून सदर गाडीचे तीन लाख रुपये लगेच देतो व बाकीचे 50 हजार रुपये गाडी नावावर झाल्यानंतर देतो असे सांगून गाडीची पूजा करायची आहे असे सांगून घाई घाईत गाडी घेऊन निघून गेले. त्यानंतर फिर्यादी यास आरोपी यांनी दिलेले पैशाचे बंडल मोजण्यासाठी सुरुवात केली असता बंडलच्या वरील व खालील अशा दोन नोटा आणि मध्ये एक नोट अशा एकूण तीन नोटाच खऱ्या निघाल्या. बाकीच्या नोटा या भारतीय चलनातील खऱ्या नोटा सारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील नोटा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीस आपली फसवणूक झाली हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरोपी क्रमांक एक यांना मोबाईल वरून फोन केला मात्र फोन बंद असल्याचे कळून आले. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ढमढेरे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"