भरधाव कार धडकेत फौजदार यादव यांचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव कार चालकाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 20 मार्च रोजी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान थरमॅक्स चौकाकडून खंडोबा माळकडे जाणाऱ्या रोडवर घडली. कारच्या धडकेत फौजदार रामखिलावन यादव (वय 59) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सोमनाथ भीमराज दिवटे (वय 43, पोलीस शिपाई, निगडी पोलीस ठाणे, रा. रूम नंबर 06 वैभव आपारमेंट, टेलिफोन एक्स्चेंज जवळ देहूरोड )यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय रमेश जिंदल (वय 56, प्लॉट नंबर 301, सेक्टर नंबर 28, म्हाळसाकांत चौक, निगडी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एम.एच 14 के.एन/ 68 25 )च्या चालकाने त्यांच्या ताब्यातील कार बेदकारपणे चालवून थर्मास चौकाकडून खंडोबा माळ चौकाकडे येणारे फौजदार राम खिलावण यादव यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला, माथ्याला तसेच हाताला दुखापत होऊन त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाले. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी हे तपास करत आहेत.

