फक्त मुद्द्याचं!

15th March 2026
पिंपरी-चिंचवड

सत्तेची भूक भागविण्यासाठी भाजपाचा अट्टहास!

सत्तेची भूक भागविण्यासाठी भाजपाचा अट्टहास!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात वाढ करून दहा क्षेत्रीय कार्यालय करावीत अशी उपसूचना मांडून सत्ताधारी भाजप भाजपने सत्तेचे किती हाव आहे हे दाखवून दिले आहे. सर्वकाही आम्हालाच मिळाले पाहिजे हा भारतीय जनता पक्षाचा अट्टहास का आहे? परंतु यामुळे प्रशासकीय खर्चात किती खर्च वाढेल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे का?

viara vcc
viara vcc

2017 साली सहा क्षेत्रीय कार्यालयांचे आठ क्षेत्रीय कार्यालयात भाजपनेच वाढ केली कारण सर्व क्षेत्रीय कार्यालयात आपलाच अध्यक्ष असावा ही त्यांची भूमिका आहे. आजही तेवढेच नगर सदस्य असताना हा अट्टहास कशासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसने या क्षेत्रीय कार्यालयाच्या वाढीस विरोध केला आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष पद तुम्ही घ्या पण महापालिका प्रशासकीय खर्चात वाढ करू नका अशी भूमिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटाने घेतली आहे.

दहा क्षेत्रीय कार्यालय करण्यासाठी आस्थापना तसेच नवीन इमारतीचा खर्च वाढणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना अशा पद्धतीने प्रभाग फोडण्यास सत्ताधारी वगळता सर्वांनी विरोध केला .नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, शहरातील कचरा व्यवस्थित उचलला जात नाही, स्थानिक आमदारांच्या आग्रहास्तव पदांचे वाटप व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपचा खटाटोप आहे. सत्ताधाऱ्यांकडे चांगले बहुमत असताना शहराच्या विकासासाठी चांगले काम करा. विरोधी पक्ष देखील सहकार्य करेल, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी शहराला वेठीस धरू नका अशी भूमिका शहरवासीयांकडून मांडली जात आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याला 30 ते 35 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या घटलेली आहे. याचा देखील प्रशासनावर ताण येत आहे. ठेकेदारीवर घेतलेले कर्मचारी मनापासून काम करतात का, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शिवाय गेल्या तीन वर्षात माजी आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या विकास कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. नाहक खर्च करून शेखर सिंग यांनी पालिकेची लूट केली आहे, याची माहिती घेऊन सत्ताधाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"