फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

सिलेंडरची टाकी डोक्यात मारून खून: एकास अटक

सिलेंडरची टाकी डोक्यात मारून खून: एकास अटक

पिंपरी : जेवण बनविण्याच्या कारणास्तव झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात सिलेंडर टाकी मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवार 9 मार्च रोजी रात्री नऊ ते साडे अकराच्या दरम्यान शंकेश्वर स्पर्श बांधकाम प्रोजेक्ट कुदळे वस्ती येथे घडली.

 याप्रकरणी अनिकेत विनायक भुरे (वय 21, रा. रूम नंबर 802, भालचंद्र उपवन सोसायटी, पुनावळे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप विठ्ठल गुंडरे (वय 31, रा. अंदोरी, अहमदपूर, जि. लातूर असे आरोपीचे नाव आहे .पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बालाजी मारुती खंडारे (वय 29, हंगरगा ता. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बालाजी आणि आरोपी हे नातेवाईक असून दोघेही नंबर पी दोन 64 पत्र्याच्या खोलीमध्ये दुसऱ्या फ्लोअरवर शंकेश्वर स्पर्श प्रोजेक्ट मोशी येथील एका कंट्रक्शन साइटवर मजूर म्हणून काम करत होते. त्याच ठिकाणी रहात होते. दरम्यान सोमवार दिनांक 9 मार्च रोजी रात्री दारू पिल्यानंतर जेवण बनवण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यात आरोपी प्रदीप याने बालाजी यांच्या डोक्यात सिलेंडरची टाकी टाकून गंभीर जखमी केले .त्यातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

 ट्रकच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू! 
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकी स्वराला मागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 9 मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वाकड मुळा नदी पुलाजवळ घडली.

याबाबत मृत तरुणाचा मित्र प्रीतीश पद्माकर ठाकरे (वय 35, रा. रेवंत सोसायटी, फ्लॅट नंबर 702 /2 मोहन नगर, बाणेर, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .ट्रकचालक शरद दत्तू मोरे (वय 36, तलमोड ता. उमरगा ,जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मित्र अभिजीत घाडगे हा हिंजवडी कडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना मुळा नदी पुलावर मुंबई बेंगलोर हायवे येथे आरोपी याने त्याच्या ताब्यातील एम.एच. 25/ यु /131 ट्रक वाहतुकीचे नियममाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून अभिजीत घाडगे यांच्या मोटरसायकल (एम. एच. 08/ ए आर /24 26 ला पाठीमागून जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान याचा मृत्यू झाला .बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"