फक्त मुद्द्याचं!

10th March 2026
गुन्हेगारी

खंडणीसाठी जबरदस्तीने अपहरण; परप्रांतीय पाच आरोपींना अटक!

खंडणीसाठी जबरदस्तीने अपहरण; परप्रांतीय पाच आरोपींना अटक!

खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी : राहटणी येथील फाउंटन हॉटेल समोरून एका व्यक्तीचे पाच जणांनी 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी जबरदस्तीने अपहरण केले. खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांचे पथकाने संगमनेर टोल नाक्याजवळ सापळा रचून परप्रांतीय पाच आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना सोमवार नऊ मार्च रोजी घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या भावाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने विविध टीम करून तपास केला. याबाबत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर शिवाजी पवार यांनी माहिती दिली आहे. आरोपी हे सतत खंडणीची मागणी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या भावाशी करत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींचा मार्ग शोधला. आरोपी हे उत्तर प्रदेश मध्ये अपहरणकर्त्याला घेऊन जात असल्याचे समजले. याशिवाय आरोपीने आळेफाटा येथे पैसे घेऊन बोलावल्याने गुन्हे शाखेकडील खंडणी पथकातील टीम द्वारे सापळा लावण्यात आला होता .आरोपींनी केलेल्या फोन द्वारे आरोपींची माहिती मिळत होती आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक यूपी 70 -92 72 या कारमधून अपहरण झालेल्या व्यक्तीला घेऊन गेले होते. संगमनेर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्याशी खंडणी विरोधी पथकाने संपर्क करून सहकार्य मागितले होते.

संगमनेर टोलनाका येथे सापळा लावून आरोपींना जेरबंद करण्यात आले. चंद्रशेखर दीपचंद गौड (वय 34, रा. सरदारगंज, ता. मेहानगर जि. अजमगड, उत्तर प्रदेश), दिलीप मोहनलाल सरोज (वय 28, रा.ईपुर ता.बारव जि. प्रतापगड), रिंकू अलगुराम सरोज (वय 20, रा. बरहुआ भोजपूर, ता. सदर, जि. प्रतापगड), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय 26, रा. मु. पो. सलीमभदारी, ता. लालगंज, जि. प्रतापगड), मुकेश कुमार राममुरत चमार (वय 24, रा. काशीपूर, ता कांन्डा , जि. प्रतापगड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्टल, सहा जिवंत राऊंड, पाच मोबाईल, फिर्यादी यांचे सात लाख रुपये किमतीचे घड्याळ, स्विफ्ट कार व इतर असा एकूण 18 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तीस चंदनपुरी घाट संगमनेर येथे सोडून दिले होते .त्यास गुंडाविरोधी पथकाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, गणेश मेदगे, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड; गंगाराम चव्हाण, नितीन गेंगजे, श्याम बाबा, रामदास मोहिते यांनी शोध घेऊन सुखरूप ताब्यात घेतले .

अपहरण केलेल्या व्यक्तीची माहिती देणाऱ्या आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. संतान सुरेश चव्हाण (वय 35, रा. समा कॉलनी, काळेवाडी ,मूळ राहणार- चकला घर, ता. सदर, जि. अजमगड, उत्तर प्रदेश) यास काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव, स्वप्निल खेताले, प्रमोद कदम यांनी कारवाई करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना काळेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे ,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, गणेश गिरी गोसावी, ज्ञानेश्वर कुराडे, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, गणेश मेदगे यांच्या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"