फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
पिंपरी-चिंचवड

पुनावळे येथील इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू!

पुनावळे येथील इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू!

पिंपरी :आयटी कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवणाऱ्या आणि वास्तवात पोल्ट्री फार्म वर काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना पुनावळे येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. वैभव दत्तात्रय सुतार (वय 25 रा. काळेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे .

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की पुनावळे भागातील पेठकर सीयोना हाउसिंग सोसायटीच्या 24 व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली .त्याचे मित्र सौरव तापकीर आणि हर्षवर्धन चिंचवडे यांनी त्याला रुग्णालयात नेले होते. सौरव तापकीर हा पुनावळे परिसरात राहतो बुधवारी रात्री वैभव सुतार, सौरव तापकीर आणि त्याचे मित्र जेवणासाठी एकत्र आले होते

.वैभव हा गेल्या दोन वर्षापासून मानसिक तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वैभव याने आपल्या कुटुंबाला तो हैदराबाद मधील एका आयटी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले होते. काही दिवसापूर्वी जेव्हा तो घरी या परतला, तेव्हा त्याची बदली चेन्नईला झाल्याचा दावा त्याने केला होता. मात्र हे खोटे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे . प्रत्यक्षात तो मावळ तालुक्यातील चांदखेड परिसरात त्याचा मित्र सौरव तापकीर याच्या पोल्ट्री फार्म वर काम करत होता.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"