गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बाहण्याने 15 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : एमएनजीएल गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बाहण्याने एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. ही घटना मंगळवार दिनांक 17 ते बुधवार 18 फेब्रुवारी दरम्यान स्वप्ननगरी, उद्यम नगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी एका व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .त्यानुसार राकेश पटेल आणि दशरथ आप्पा वालेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला व्हाट्सअप वर एक नोटीस आली होती. त्यामध्ये बिल न भरल्यामुळे गॅस कनेक्शन कापले जाईल असे म्हटले होते. फिर्यादीने खात्री करण्यासाठी संपर्क साधला असता आरोपीने त्यांना दहा रुपये भरण्यास सांगून कार्डची माहिती मिळवली. ट्रांजेक्शन फेल झाल्याचे वाचून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल 15 लाख रुपये काढून घेतले .याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

