फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
महाराष्ट्र

मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानीच आरोपी; पार्थ पवार यांना दिलासा!

मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानीच आरोपी; पार्थ पवार यांना दिलासा!

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या आरोप पत्रामध्ये फक्त शितल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे .शितल तेजवानी यांच्यावर या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपत्रात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत . त्यामुळे पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे .

viara vcc
viara vcc

आर्थिक गुन्हे विभागाने हे दोषारोप पत्र दाखल केले आहे .या दोषारोप पत्रामध्ये फक्त शितल तेजवानी यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आलेले आहेत. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालच केली होती. त्यानंतर आज ही मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी शितल तेजवानी विरुद्ध न्यायालयात 1886 पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? राजकारणासाठी न्याय हा शब्दच रद्द झालाय का? पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी हा व्यवहार अवैध असून तो रद्द करण्यात यावा यासाठी आठ डिसेंबर 2025 रोजी अर्ज केला आहे. पुणे जमीन घोटाळ्यात आरोप पत्र फक्त शितल तेजवानी यांच्यावरच खडक पोलिसांकडून दाखल झाले आहे हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"