फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

शहरातील वाहन चोरी मधील तीन गुन्हे उघड;एकास अटक!

शहरातील वाहन चोरी मधील तीन गुन्हे उघड;एकास अटक!

काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट पथकाची कारवाई
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील वाहन चोरी मधील तीन गुन्हे काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उघड केले आहेत. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. या आरोपीला मुंबई पुणे महामार्गावर ताब्यात घेण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात वाहन चोरी प्रकरणे घडत असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेवाडी राजेंद्र बहिरट यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव व तपास पथकातील अंमलदार यांना रेकॉर्डवरील वाहन चोरी करणाऱ्या गुन्हे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार एका बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली .आरोपी शिवा मिठूलाल यादव (वय 20, रा. वरद रेसिडेन्सी, रूम नंबर 402, देहू आळंदी रोड चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चौकशी दरम्यान आरोपी यादव याचा संशय आल्याने कौशल्य पूर्ण त्याच्याकडे तपास केला असता त्याने फिर्यादी यांची टाटा सुमो गोल्ड गाडी (नंबर एम एच 14 सीएक्स 25 89) ही 29 जानेवारी रोजी चोरी केली. आरोपीच्या शिवा इंटरप्राईजेस नावाच्या मोई येथील स्क्रॅप सेंटरमध्ये सुटे भाग करून तोडून वेगवेगळे केल्याचे सांगितले. आरोपींनी ज्या स्क्रॅप दुकानात हा स्क्रॅप विकला त्या दुकानातून तीन गाड्यां चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींनी काळेवाडी पोलीस स्टेशन, भोसरी पोलीस स्टेशन, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमधील वाहनांची चोरी केली होती .तसे गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत .आरोपीकडून तीन लाख तीस हजार रुपये किमतीचे चार चाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"