तळेगाव एमआयडीसी व शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन हातभट्ट्यांवर कारवाई !

पिंपरी: तळेगाव एमआयडीसी व शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे तीन लाख 81 हजार रुपये किमतीचे गुळमिश्रित रसायन जप्त केले. मात्र पोलिसांना एकही आरोपी सापडला नाही.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आंबी गावचे शिवारात, सार्क ऍग्रो कंपनी शेजारी, राठोड वस्ती, जिना राठोड हिचे घराजवळ आंबेगाव, ता. मावळ येथील दारूभट्टीवर छापा टाकला. यावेळी दोन लाख 36 हजार 250 रुपये किमतीचे 6 750 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आले पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला (वय 30, राठोड वस्ती ,आंबेगाव, ता. मावळ),महिला आरोपी (वय 45, राठोड वस्ती, आंबेगाव, ता. मावळ) हे पळून गेले. याबाबत सदानंद विजय रुद्राक्ष पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार 20 जानेवारी रोजी आंबेगावच्या शिवारात घडली याप्रकरणी पोलीस हवालदार शेख पुढील तपास करून करत आहेत.

1 लाख 45 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार 20 जानेवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास राजू पालेकर यांचे वीट भट्टी जवळ, मानमोडी ओढ्यालगत, दारूंबरे ता. मावळ येथे पोलिसांनी दारू हातभट्टीवर छापा टाकला. याबाबत अमोल सुभाष गोरे पोलीस शिपाई, गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली आहे.
एका महिला (रा. दारुंबरे, ता मावळ ) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एकूण एक लाख 45 हजार रुपये किमतीचे 2900 लिटर उग्र वासाचे गावठी दारू तयार करण्याचे पिवळे रंगाचे रसायन व त्याच्याशी निगडित साधनसामुग्री ताब्यात घेण्यात आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी ने तेथून पोबारा केला. जागेवर मिळालेले रसायन व साहित्य पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले. याबाबत शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कोंडे पुढील तपास करत आहेत.

