फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत डॅनफॉस कंपनीला विजेतेपद!

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत डॅनफॉस कंपनीला विजेतेपद!

पिंपरी औद्योगिक क्रीडा संघटनाच्या ६२ब्या शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत डॅनफॉस कंपनीला विजेतेपद मिळाले असून द्वितीय क्रमांक फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,तृतीय क्रमांक सीएएफव्हीडी संघाला मिळाला. प्रबोधनकार ठाकरे मैदान,यमुनानगर,पिंपरी-चिंचवड येथे रविवार 18 जानेवारी रोजी स्पर्धा संपन्न झाली.

viara vcc
viara vcc

या स्पर्धेस टाटा मोटर्स,एसकेएफ,सीएएफव्हींडी,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडिया,बजाज ऑटो(वाळुंज),सेचुरीएंका,महेन्द्रा चाकण, जेसीबी, ईलीनडब्लूजी,डॅनफाॅस, पीसीएमसी, पीएमपीएमएल अशा विविध कंपन्याच्या १५ संघानी भाग घेतला.ही स्पर्धा फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, इंडियाने पुरस्कृत केली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने झाली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक डॅनफॉस,द्वितीय क्रमांक फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,तृतीय क्रमांक सीएएफव्हीडी संघाला मिळाला. पीसीएमसी,टाटा मोटर्स”ब”,टाटा मोटर्स“अ”, एसकेएफ,पीएमपीएमएल “ए” संघटना अनुक्रमे चौथा,पाचवा,सहावा, सातवा,आठवा क्रमांक मिळाला.स्पर्धेचे पारितोषिक वितरण फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे रवींद्र चव्हाण (सिनियर व्हाइस प्रेसिडेंट फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स) जितेंद्र राणा (व्हॉइस प्रेसिडेंट फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स),अशोक त्यागी(प्रोडक्शन हेड फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स) व औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते झाले.

पारितोषक वितरण प्रसंगी बोलताना जितेंद्र राणा म्हणाले की जिंकणे आणि हरणे हे एकसमान समजण्याची शक्ती, प्रेरणा आपल्याला खेळातून मिळते व त्यातूनच खेळाडू घडतो. या स्पर्धेच्या वेळी राष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश्वर उर्फ माऊली पवळे यांचा क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल औद्योगिक क्रीडा संघटनेकडून सन्मान करण्यात आला. औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम व सचिव वसंत ठोंबरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे प्रदीप वाघ , हरी देशपांडे , विजय हिंगे,संतोष शिंदे,आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम ही उपस्थित होते.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन नंदकुमार भोईटे(स्पर्धा निरीक्षक) भाऊसाहेब जाधव व के डी वाघमारे, राजेंद्र माघाडे, राजेश सोडल, अनिल सोनेकर हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू, पंच म्हणून काम पाहत आहेत या स्पर्धेत मंदार कुलकर्णी, माऊली पवळे, सारंग नाईक,माऊली पवळे,तुकाराम राऊत,बाळासाहेब भोंडवे,सुनील मेहत्रे,अनिल राऊत यांचे मोलाचे साह्य लाभले आहे.कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन केडी वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन वसंत ठोंबरे यांनी केले

अंतिम फेरीमध्ये डॅनफॉस विरुद्ध फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या सामन्यांमध्ये डॅनफॉस २५-४ ने विजयी झाला व डॅनफॉस संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांमध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सकडून अंकुश बोडके, अशोक त्यागी, संजय बोराटे, जहीर शेख तर डॅन फॉस कडून अनिल पिसाळ, मनोज सोनवणे यांचा खेळ अतिशय सुरेख झाला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"