फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
गुन्हेगारी

निगडी, पिंपरीतून दोन पिस्तूल जप्त ; दोघांना अटक!

निगडी, पिंपरीतून दोन पिस्तूल जप्त ; दोघांना अटक!

पिंपरी: पिंपरी आणि निगडी परिसरातून पोलिसांनी दोन व्यक्तींकडून दोन पिस्तूल जप्त केले. एका व्यक्तीला अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार 11 जानेवारी रोजी करण्यात आली. निगडी येथील स्मशानभूमी जवळ सार्वजनिक ठिकाणी देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

viara vcc
viara vcc

सुशील उर्फ बारक्या भरत गोरे (वय 20, रा. विलासनगर, ओटा स्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई दीपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुशील यांच्याकडे पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी शस्त्रे जप्त करून त्याला ताब्यात घेतले आहे.

पिंपरी परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई रोहित वाघमारे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला पिस्टल पुरवणाऱ्या प्रताप सिंग (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाकडून पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. त्यांनी हे पिस्तुल मध्य प्रदेशातील प्रताप सिंग नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे कबूल केले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"