फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा!

राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे महापालिका प्रशासनाकडील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध नियोजनात्मक बाबींची माहिती यावेळी बैठकीत दिली.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ मतदान होणार असून मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत सर्वंकष तयारी करण्यात आली असून याबाबत आज राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आढावा घेतला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आचारसंहिता कक्षप्रमुख उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांच्यासह महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहायक नगररचनाकार प्रशांत शिंपी, उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

बैठकीत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, संभाव्य दुबार मतदान टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्ट्रॉंग रूमची सुरक्षित व्यवस्था, मतमोजणी केंद्रांची आखणी, तसेच निवडणूक कालावधीत माहिती संकलन व प्रसारासाठी स्थापन करण्यात आलेल्या मीडिया सेलच्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीची कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदान जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मतदारांच्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र, तसेच प्रसारमाध्यमांमधील जाहिराती व बातम्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) प्रभावीपणे कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याशिवाय, ईव्हीएम मशीनसाठी आवश्यक साहित्य, पोस्टल बॅलेट मतदानाची व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगराणी ठेवण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"