फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

थेरगाव -गुजरनगर प्रभाग 24 मध्ये भाजप- शिवसेनेला अपक्षांची साथ!

थेरगाव -गुजरनगर प्रभाग 24 मध्ये भाजप- शिवसेनेला अपक्षांची साथ!

 पिंपरी : उमेदवारांना शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्यासाठी ताटकळ ठेवल्याने  थेरगाव -गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मध्ये एबी फॉर्म वेळेत दाखल न झाल्याने अधिकृत उमेदवारी रद्द करावी लागली. मात्र संबंधित उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरल्याने त्यांना भाजप शिवसेना पक्षांना पुरस्कृत करावे लागणार आहे.

viara vcc
viara vcc

शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये समन्वय नसल्याने तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या. वेळेमध्ये एबी फॉर्म न दिल्याने हा गोंधळ निर्माण झाला. भाजप शिवसेनेवर ही नामुष्की थेरगाव -गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 येथे आली. त्यामुळे या प्रभागात संबंधित उमेदवारांना कमळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह मात्र मिळणार नाही. अन्य चिन्हावर त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे.

भाजपचे उमेदवार गणेश गुजर, शालिनी कांतीलाल गुजर, करिष्मा बारणे यांना वेळेत एबी फॉर्म दाखल करण्यात आला नाही. तर या मतदारसंघातीलच सिद्धेश्वर बारणे यांचा एबी फॉर्म वेळेत दाखल झाल्याने पॅनल मध्ये ते एकटेच कमळ चिन्हावर लढतील. शिवसेनेचे रूपाली गुजर व निशा अनिकेत ताम्हाने या उमेदवारांना आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागेल. त्यांच्या पॅनल मधील विश्वजीत बारणे व विशाल बारणे यांनी वेळेत एबी फॉर्म दाखल केला. रूपाली गुजर व निशा ताम्हणे यांना अपक्ष म्हणून धनुष्यबाण व्यतिरिक्त चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.

एबी फॉर्म पक्षाने वेळेत दिला नाही? की वेळेचे बंधन उमेदवारांना समजले नाही? की सत्तेच्या जोरावर आपण आपला एबी फॉर्म दाखल करू? हा भ्रम भाजप आणि शिवसेनेमध्ये दिसून आला आहे. प्रभाग 24 मध्ये भाजप शिवसेनेला अपक्षांची साथ

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"