फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पुणे

चाकण औद्योगिक क्षेत्राची वाहतूक कोंडी-समस्यामुक्तीकडे वाटचाल : महेश लांडगे

चाकण औद्योगिक क्षेत्राची वाहतूक कोंडी-समस्यामुक्तीकडे वाटचाल : महेश लांडगे

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बैठक
पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्यांवर ठोस उपायोजना झाल्या नाहीत. परिणामी, चाकरमानी, वाहनचालक आणि औद्योगिक कंपन्या त्रस्त झाल्या होत्या. मात्र, आता औद्योगिक क्षेत्र समस्यामुक्तीच्या दिशेने वाटचाल करील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांबाबत औद्योगिक संस्था संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी #UNCLOG_Chakan_MIDC मोहीम हाती घेतली. तसेच, काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती.

viara vcc
viara vcc

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई येथील दालनामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्र वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या मावळ, खेड परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्य अधिकारी, चाकण/तळेगांव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हिंजवडीप्रमाणे ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ करा…
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) एलिव्हेटेड कॉरिडॉर भूसंपादन (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पीएमआरडी, एमआयडीसी, नॅशनल हायवे, पीडब्ल्यूडी किंवा जिल्हा परिषद अशा सर्व अस्थापनांशी समन्वय करण्यासाठी ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’) पिंपरी-चिंचवडमधून चाकण औद्योगिक पट्टयात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा विस्तार आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) काम सुरू करणे. यासह रस्त्यांचे विस्तारीकरण व देखभाल, वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, पार्किंग व्यवस्थापन, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग (फ्रेट कॉरिडॉर), स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपालिका), MSRDC, PWD, RTO आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय करुन दीर्घकालीन वाहतूक मास्टर प्लॅन तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्याला मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"