शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हस्ते प्रदान!

बालेवाडी: सामाजिक सुधारणा ,शिक्षण ,उद्योग किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे ,आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील महाराष्ट्राला स्थान मिळवण्यासाठी लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी व्हावे लागेल असे मत राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022 -23, 2023 -24 वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,पणनमंत्री जयकुमार रावल ,विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे ,शंकर जगताप ,क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार ,आदी यावेळी उपस्थित होते .
2022- 23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पट्टू प्रदीप गंधे यांना तर सन 2023- 24 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना वितरित करण्यात आला. छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि अन्य सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले. आजचा खेळ हा तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आशियाई तसेच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासून खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल .शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे राधाकृष्णन म्हणाले .
शिवछत्रपतींचे नाव या पुरस्कारांच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत जोडले जात आहे ,असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राज्य मान्यता आहे. हा पुरस्कार प्राप्त खेळाडू ,प्रशिक्षक ,भूतपूर्व खेळाडू आदी सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण एक योगदान देऊ अशा प्रकारची मानसिकता बाळगावी.शिवछत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली, तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे, आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सर्वच पुरस्कार त्यांनी त्यांच्या खेळावरील प्रेम ,मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे.

बॅडमिंटनपटू उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडविणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंदे व कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही आनंदाची बाब आहे जीवन गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदा महिला प्रशिक्षिकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे ,ही अभिमानाची गोष्ट आहे असे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले .यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आपले विचार मांडले 2022- 23 चे 70, 2023- 24 चे 89 याप्रमाणे एकूण 159 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. समारंभात पुरस्कारार्थी खेळाडू खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते