फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

नागरिकांना देण्यात आले अग्निसुरक्षेचे धडे!

नागरिकांना देण्यात आले अग्निसुरक्षेचे धडे!

महानगरपालिकेच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अग्निसुरक्षा मॉक ड्रील व प्रात्यक्षिकांचे आयोजन
पिंपरी : इमारतीच्या आठव्या मजल्यावर अचानकपणे लागलेली आग… स्थानिक रहिवांशाकडून आग विझवण्याचा केला जाणारा प्रयत्न…. नागरिकांनी संपर्क करताच आग विझवण्यासाठी अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलेले नियंत्रण…. असा थरारच पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या शरदनगर व दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्थायेथे पाहण्यास मिळाला.

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘म़ॉक ड्रिल’चे. भारतात दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल हा आठवडा ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ मध्ये मुंबई डॉक येथे लागलेल्या विनाशकारी आगीत प्राण गमावलेल्या जवानांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी १४ एप्रिल हा दिवस समर्पित आहे. या दिवसानंतरचा संपूर्ण आठवडा ‘अग्निसुरक्षा सप्ताह’ म्हणून पाळला जातो. महानगरपालिकेच्या वतीनेही या सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी निगडी येथील शरदनगर व दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सेक्टर क्र. २० येथे अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना व मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रील अंतर्गत इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याचे दृश्य तयार करण्यात आले. सुरुवातीला स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता, त्वरित अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत २ वॉटर टेंडर, २ शीघ्र प्रतिसाद वाहने (देवदूत), ब्रांटो हायड्रोलिक प्लॅटफॉर्म (स्काय लिफ्ट) व ३० पेक्षा अधिक अग्निशमन जवानांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

viara ad
viara ad

या मॉक ड्रीलमध्ये उंच शिडीच्या साहाय्याने इमारतीतील अडकलेल्या नागरिकांचायशस्वी बचाव करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आगीचे धोके ओळखणे, आग लागल्यानंतरचे योग्य पावले उचलणे, ग्निसुरक्षा उपकरणांचा योग्य वापर व आपत्कालीन प्रसंगी सुरक्षिततेच्या उपायांबाबत माहिती देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अग्निशमन विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तळवडे उपकेंद्राचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मॉक ड्रील मध्ये अग्निशमन विभागाचे चंद्रशेखर घुले, विकास तोडरमल, लीडिंग फायरमन शाहू व्हनमाने, वाहनचालक नितीन कोकरे, विशाल
बाणेकर यांच्यासह एकूण ३२ अग्निशमन जवान सहभागी झाले होते.

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या डॉकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अनेक शूर अग्निशामक जवानांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या अतुलनीय शौर्याची आणि बलिदानाची आठवण जपण्यासाठी हा अग्निशमन सेवा सप्ताह देशभर पाळला जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे.- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"