फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला बुलडोझर दणका!

नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला बुलडोझर दणका!

नागपूर : नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंड फहीम खान याला प्रशासनाने बुलडोझर दणका दिला. फहीम खानने केलेले अनधिकृत बांधकाम नागपूर महापालिका प्रशासनाने पाडून टाकले. नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला दिलेला हा पहिला मोठा दणका आहे.

नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्या घराचा मोठा भाग बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. नागपूरमधील यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय बाग कॉलनीत दंगलखोर फहीम खानने २ मजली इमारत बांधल्याचे तपासात उघड झाले. नागपूर महापालिकेने काल रविवारी त्यांच्या घरातील बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजावली होती. आणि त्याला बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली होती. महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतर फहीम खानचे कुटुंब घाबरले. त्यानंतर घराला कुलूप लावून त्याचे कुटुंबिय परांगदा झाले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की फहीमचे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या अनुपस्थितीत घरातील अवैध बांधकाम जमीनदोस्त केले.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. पोलिसांनी फहीम आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत नागपूर दंगल प्रकरणी १०४ आरोपींची ओळख पटविण्याचे काम झाले आहे. यातील ९२ आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे. इतर १२ आरोपी अल्पवयीन आहेत, त्यांच्या विरोधात बाल गुन्हेगारांसाठीच्या कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होणार आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"