द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांचं निधन झालं.
व्यवसायानं ते सिव्हिल इंजिनीयर होते. संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्याची त्यांना अतिशय आवड होती. त्यातूनच ते क्रिकेट समीक्षक म्हणून नावारूपाला आले. मराठी क्रिकेटरसिकांकडून त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या लिखाणाला नेहमीच दाद मिळत गेली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
बातमी अपडेट होत आहे..