फक्त मुद्द्याचं!

16th February 2026
देश विदेश

राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव!

राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव!

भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना
: सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहेत. इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे मंगळवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्सवर नुकतीच ही एक पोस्ट केली आहे.

या अविश्वास प्रस्तावावर सुमारे ७० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात काँग्रेस, बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, तामिळनाडूचा द्रमुक आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधकांना सभापती त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देत नाहीत, हे सिद्ध करायचे आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"