फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
उद्योग

अदानी समूहाचे शेअर्स थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले!

अदानी समूहाचे शेअर्स थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले!

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अडचणीतून सावरलेला अदानी समूह पुन्हा गोत्यात आला आहे. आज शेअर उघडताच सर्व स्टॉक धडाधड कोसळल्याचे दिसून आले. गौतम अदानी यांच्यावर लाच आणि फसवणूकीच्या आरोपामुळे याचा जोरदार फटका अदानी समूहाच्या शेअर्सला बसला आहे.

समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २० टक्क्यांनी घसरून ६९७.७० रुपयांवर आला आणि शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे याचा मोठा झटका गुंतवणूक दारांनाही बसला आहे.

नेमके प्रकरण काय?
अदानी यांच्यावर सौर प्रकल्पांचे कंत्राट आणि वित्तपुरवठा करण्यासाठी मोठी लाच दिल्याचा आरोप असून त्यांनी ही बाब अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवली आहे. त्यामुळे अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी यांना लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोपाखाली दोषी ठरवले आहे. या संपूर्ण प्रकरणात अदानी यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी आणि कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यासह अन्य आरोपी आहेत.

कोणत्या शेअरमध्ये किती घसरण?
अदानी ग्रीन एनर्जी – १९.१७ टक्के
अदानी टोटल गॅस – १८.१४ टक्के
अदानी पॉवर – १७.७९ टक्के
अदानी पोर्ट्स – १५ टक्के
अंबुजा सिमेंट – १४.९९ टक्के
एसीसी – १४,५४ टक्के
एनडीटीव्ही – १४.३७ टक्के
अदानी विल्मर – १० टक्के

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"