ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’ पुन्हा चर्चेत!

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांचा ‘लकी नंबर’ म्हणून ओळखला जाणारा १२१२ हा आकडा यंदाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी हा आकडा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता थेट इलेक्ट्रॉनिक बॅलेट मशीनवरील (ईव्हीएम) उमेदवारांच्या क्रमवारीतून समोर आल्याने चर्चेला अधिक धार मिळाली आहे.

ईव्हीएमवरील मांडणीत ‘१२१२’ चा दुर्मिळ संयोग
ईव्हीएमवरील उमेदवार क्रमांक पाहता नाना काटे यांच्या संपूर्ण पॅनलमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण १ २ १ २ आकडी संयोग दिसून येत आहे.
उमेश काटे हे क्रमांक – १
शीतल काटे क्रमांक – २
मीनाक्षी काटे क्रमांक – १
नाना काटे क्रमांक – २
म्हणजेच बॅलेट मशीन असल्याने १२–१२ असा पॅटर्न पुन्हा एकदा तयार झाला आहे. हा योगायोग केवळ आकड्यांचा खेळ नसून, राजकीय दृष्टिकोनातून शुभसंकेत मानला जात आहे. हा शुभसंकेत की विजयाचा इशारा देणारा आहे?
“१२१२ हा आकडा नाना काटेंसाठी नेहमीच यशाचं प्रतीक ठरला आहे. यंदाही हा संयोग सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतो,” अशी भावना अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. या आकडी पॅटर्नमुळे नाना काटे आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, प्रचारातही नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे. आकड्यांपलीकडे राजकीय अर्थ राजकारणात आकड्यांना, चिन्हांना आणि योगायोगांना नेहमीच महत्त्व दिले जाते.

