फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पर्यावरण पिंपरी-चिंचवड

मेट्रोच्या कामासाठी 57 झाडांवर कुऱ्हाड

मेट्रोच्या कामासाठी 57 झाडांवर कुऱ्हाड

पिंपरी : पुणे महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम सुरू असून या कामास अडथळा ठरणाऱ्या ५७ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. पिंपरी ते निगडी या मार्गावर ४.४१ किलोमीटर अंतराची मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहे. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कामास अडथळा ठरत असल्याने झाडे तोडण्यात येत आहेत.

५७ झाडांवर कुऱ्हाड
कडुनिंब, वड, अशोकाची दोन, पिंपळाची पाच, टबोबियाची १८, पेल्टाफोरमची, फिस्टेलमापची प्रत्येकी नऊ, उंबराची चार, फायकस, रेन ट्री ए, अशोक, स्पॅथोडिया, जांभूळ, फणसाचे प्रत्येकी एक अशी एकूण ५७ झाडे तोडली जाणार आहेत.

मेट्रोच्या मार्गिकेस अडथळा ठरणारी झाडे हटविण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावली जाणार आहेत. जगतील अशा झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, असे महामेट्रोचे संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले. तर, कामास अडथळा ठरणारी झाडे हटविण्याबाबत महामेट्रोने महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार परवानगी दिली आहे.
निगडीतील वर्तुळाकार उड्डाण पुलाजवळील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या पदपथावरील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. तेथील नऊ झाडे तोडण्यात आली आहेत. निगडी ते पिंपरीपर्यंतच्या पदपथावरील झाडे तोडली जात असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत वृक्षतोडीस विरोध केला. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"