फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
आरोग्य पर्यावरण

पवना धरण परिसरात पावसाचा जोर

पवना धरण परिसरात पावसाचा जोर

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे धरणातील येवा वाढला असून, धरणातील पाणीसाठा ३३ टक्के झाला आहे.


धरण परिसरात एक जूनपासून आजपर्यंत ७४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने ओढ दिल्यास पिंपरी-चिंचवडकरांवर पुन्हा पाणीकपातीची टांगती तलवार होती. ती आता लांबणीवर पडली आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणातील पाणीसाठ्याचा आढावा
गेल्या २४ तासांत झालेला पाऊस – ८१ मिलिमीटर
एक जूनपासून झालेला पाऊस – ७४३ मिलिमीटर
गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस – ६६३ मिलिमीटर
धरणातील सध्याचा पाणीसाठा – ३३.२६ टक्के
गेल्यावर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा – ३१.०९ टक्के
गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यातील वाढ – ४.४९ टक्के
एक जूनपासून पाणीसाठ्यातील वाढ – १५.८३ टक्के
…..

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"