फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
गुन्हेगारी पिंपरी-चिंचवड

दरोड्याच्या तयारीत असताना तिघांना अटक

दरोड्याच्या तयारीत असताना तिघांना अटक

पिंपरी, प्रतिनिधी : एका व्यक्तीने हातात दोन कोयते घेऊन सोशल मीडियावर फोटो अपलोड केले. त्याबाबत कारवाई करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दरोड्याच्या तयारीत असताना तिघांना अटक केली.

विष्णू दिगंबर पवार (वय २०, रा. वडगाव मावळ, ता. मावळ), करण राहुल लोखंडे (वय १८, रा. काळाखडक, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारांच्या सोशल मीडियावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडणीविरोधी पथकाला एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याने दोन कोयत्यांसह फोटो टाकला असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता फोटोमधील व्यक्ती त्याच्या साथीदारांसह साखरेवस्ती, हिंजवडी येथील एका पडक्या रो-हाऊस मध्ये दिले आहेत. ते घातक शस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून चौघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, एक पालघन, मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे दोन साथीदार ऋषिकेश जाधव आणि बाबू शेख (दोघे रा. काळाखडक, वाकड) हे पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पळून गेले. आरोपींवर जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, चोरी असे सात गुन्हे दाखल आहेत.
….

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"