फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
क्रीडा

कांस्य विजेत्या मनूला पंतप्रधानांचा फोन येतो तेव्हा!

कांस्य विजेत्या मनूला पंतप्रधानांचा फोन येतो तेव्हा!

पीटीआय : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाज मनू भाकर हिने भारताला पहिलं पदक पटकावून दिलं. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी मनू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्याशी फोनवर बोलून भावना व्यक्त केल्या. मनू भाकर पंतप्रधानांशी बोलतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तुलातील बिघाडामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली होती, याचा उल्लेखही त्यांनी केला.

पंतप्रधान भाकरला म्हणाले, थोडक्यासाठी तुझं रौप्यपदक हुकलं, पण देशासाठी कांस्यपदक जिंकत भारताचं नाव मोठं केलंस. त्यामुळे दोन प्रकारे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रथम, तू कांस्यपदक जिंकले आणि दुसरं भारतासाठी ही कामगिरी करणारी तू पहिली महिला नेमबाज आहेस. हे ऐकून मनू भाकरने स्मित केलं आणि आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"