Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
महाराष्ट्र

चिखलीत ८०० कोटींच्या बॅटरी संशोधन केंद्राची उभारणी होणार!

चिखलीत ८०० कोटींच्या बॅटरी संशोधन केंद्राची उभारणी होणार!

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्सचा करार
पिंपरी : . सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स यांच्यात चिखली येथील रिसर्च पार्कमध्ये स्वदेशी बॅटरी संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. ८०० कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे.

viara vcc
viara vcc

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात उद्योग, संशोधन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. चिखलीतील हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करारावर सीओईपीतर्फे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे आणि जेएसडब्ल्यू समूहातर्फे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

indra dairy
indra dairy

प्रस्तावित केंद्रात लिथियम-आयन, सोडिअम-आयन आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी सेलचे संशोधन, प्रोटोटायपिंग व प्रमाणीकरण होणार आहे. केंद्र दोन टप्प्यांत विकसित करण्याचे नियोजन असून, त्यातून एक हजार रोजगारसंधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना आणि युवा अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. या भागीदारीबाबत जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी, “सेल हे या शतकातील नवीन इंधन असून हे सेल भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे,” असे म्हटले आहे. सीओईपीसोबतची भागीदारी उद्योग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडला ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ तसेच सीओईपी आणि आयआयएम नागपूरच्या शैक्षणिक संधी शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. आता चिखलीतील बॅटरी संशोधन केंद्रामुळे या संकल्पात उद्योगाशी जोडलेल्या संशोधनाची भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"